
चिंतामणीचं दर्शन झालं. आता त्याच्या समोरच पाच मिनिटांवर असलेला काळाचौकीचा महागणपती बघायचा होता. पावसाने तर खूप जोर धरलेला, त्यात अनवाणी चालायचं होतं. आता मुख्य रस्ता ओलांडून पलीकडे आलो. थोडं चाललं की डाव्या हाताला महागणपतीच प्रवेशद्वार.

ह्या बाप्पाची विशेष गोष्ट म्हणजे त्याच्या प्रवेशद्वारात दोन्ही बाजूला चिकटून चाळी आहेत. जेमतेम बप्पा जाईल एवढाच रस्ता आहे. त्यामुळे बाप्पाची उभी असलेली उंच मूर्ती बसवतात.
ह्या आधी मी 2019 ला पहिल्यांदा आलेलो. त्या वर्षी बाप्पाचा अवतार हा विठ्ठल रुपी होता. खूप मनांत भरलेला म्हणून ह्या वर्षी कमी वेळ आणि एवढ्या त्रासात सुद्धा दर्शनाला आलेलो. इथे सुद्धा तिथल्या घरांच्या दारातून जावं लागत होतं.

इथे सुद्धा काहीच गर्दी नव्हती. बाप्पाच्या पायापाशी उभा राहून मन भरून बाप्पाला बघत राहिलो. आता साडेपाच वाजून गेलेले. आता परतीचा मार्ग धरायचा होता. बाप्पाचं शेवटचं दर्शन घेतलं आणि तिथून निघालो..
आता काहीकरून अलिबागकडे निघायचं होतं. आजपण पाऊस त्यात अनवाणी, चालायची ताकद नाही. स्टेशन पर्यंत चालता येईल की नाही, वेळेत गेट वे पोचून शेवटची बोट असेल तर भेटेल का? अजून अर्धा एक तास तरी पोहोचायला लागणार होता.. बोट नाही भेटली तर पुढे काय?…

मुंबईच्या राजाच्या प्रवेशद्वारा समोरच असलेला ‘तेजुकायाचा राजा’चं दर्शन मी लालबागच्या राजाच्या आधी घेतलं होतं. ह्या बाप्पाची एक परंपरा आहे, बाप्पाचं आगमन आणि विसर्जन भक्तांच्या खांद्यावरून होतं. आणि विशेष म्हणजे ही मूर्ती कागदाच्या लगद्यापासून बनवली जाते. ह्या बाप्पाचं सुद्धा आगमन पाहिलं होतं.
क्रमशः
Leave a comment