मी पाहिलेले गणपती आणि अनुभवलेली भव्यता (वाटाड्या)

थोडा त्रास सहन करत पुढे चालत राहिलो. गुगल मॅप माझा वाटाड्या बनून मला रस्ता दाखवत होता. चालता चालता एका भाजी बाजारात पोचलो. वाटलं रस्ता चुकलो की काय? कारण कधीकधी अश्या गर्दीच्या ठिकाणी गुगल मॅप पण थोडासा गांगरतोच. किंवा कधी कधी ते ठिकाण आपल्या आजूबाजूलाच असतं, गुगल मॅप म्हणतं तुम्ही त्या ठिकाणावर पोचला आहात. पण ते ठिकाण आपल्यासाठी नवीन असल्यामुळे ठिकाण सामोरं असलं तरी आपल्या लक्षात येत नाही आणि आपण बिचाऱ्या गूगल मॅपला बडबडतो. असंच काहीसं माझ्या बाबतीत झालं.

त्या भाजी बाजारात पोचलो, कदाचित रस्ता चुकलो म्हणून त्या गुगल मॅपला दोष दिला. पण तरीही पुढे पुढे चालत गेलो. थोडं पुढे जाताच एक काळ्या रंगाचा मंडप दिसू लागला होता. ती त्या मंडपाची मागची बाजू होती. मी आगमनाचे फोटो बघितले त्यात कुलब्यामधले गणपती आकाराने खूप मोठे दिसत होते. त्यामुळे मनांत असा विचार होता की गणपती मोठा असेल तर मंडपही मोठे असतील. पण त्यामानाने समोर दिसणारा मंडप लहानच वाटत होता. मी त्या मंडपाच्या जवळ गेलो. तेव्हा थोडा अंदाज आला की हा गणपतीचाच मंडप आहे म्हणून.

नंतर लक्षात आलं की गूगल मॅप तर बरोबर होता. माझ्यासाठी हे ठिकाण अनोळखी असल्यामुळे माझ्या लक्षात आलं नाही. फक्त एवढंच की गूगल मॅपने मला शॉर्टकटने मागच्या बाजूने घेऊन आला होता.

पाऊस अजूनही पडतच होता. आता कुठे पहिला गणपती पाहणार होतो. कुलाब्याचे गणपती बघायचा बेत तर होताच पण वेळेअभावी जर शक्य नसतं झालं तर ते न बघता दुसरे जे महत्वाचे आहेत माझ्यासाठी ते बघणार होतो. पण बेत बनवायच्या आधी मला निदान एक गणपती बघायचाच होता. त्या गणपतीचं आगमन बघितलं होतं पण त्या गणपतीचं नाव काय आहे हे त्या वेळी विसरलो होतो. मॅप वर जो आधी दिसला तो रस्ता पकडला आणि त्या ठिकाणापर्यंत पोचलो.

जे मॅप वर नाव होतं ते त्या मंडपाच्या वरती पटकन लक्षात येणार नाही असंच होतं. पावसाचा आणि चपलांचा आधीच वैताग आलेला. त्या चपला मंडपाच्या बाहेर काढल्या, तेवढंच जरा वेळ बरं वाटलं. ह्या पहिल्या गणपतीच्या मंडपापर्यंत पोहोचेपर्यंत बाप्पाने खूप कष्ट दिले. अजून खूप गणपती बघायचे होते. बाप्पा अजून किती कष्ट देणार हे त्याचं त्यालाच माहिती होतं.

मी आता त्या मंडपात शिरणार तेवढ्यात जे समोर बाप्पाचं रूपं दिसलं ते ……..

क्रमशः

Discover Eventure 2025

An event for curious minds committed to the planet. Engineers, designers, educators, biologists, technologists, artists, city-makers, and activists — all working at the intersection of nature, science, and innovation to build a more sustainable future.

Join the Club

Stay updated with our latest tips and other news by joining our newsletter.

Leave a comment